
🌺न्यू ईरा हायस्कूल , अकोला🌺
सर्व सन्माननीय ,
माजी विद्यार्थ्यांना नमस्कार,
आपण सर्वजण शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी 1960 ते 2015 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा घेऊन जागतिक विक्रम नोंदविण्याकरिता एकत्र जमणार आहोत .आपण बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित राहणार याची आम्हाला खात्री आहे.
खूप मोठे शिवधनुष्य माजी विद्यार्थ्यांची स्थानिक समितीला उचलतेय , जशी जशी संख्या नोंदणी होईल तशी तशी करावयाच्या कामाची व्याप्ती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची आवश्यकता लक्षात येतेय. सर्व दृष्टीने बारीक नियोजन करावे लागेल. याकरिता आपणच सर्व माजी विद्यार्थी स्वतः निधी उभारून मेळावा आयोजित करित असलो तरी अर्थतज्ञांचा कायदेशीर सल्ला घेऊन न्यू ईरा शाळेच्या व्यवस्थापन मंडळाच्या बँक खात्याशी संलग्नित एक स्वतंत्र खाते युनियन बँक ,अकोला,शाखा येथे उघडण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मंडप, विद्यूत व ध्वनी व्यवस्था, चहा- नाश्ता-भोजन, कार्यालयीन काम, मंच व्यवस्थापन ,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था इत्यादी विविध समित्या कराव्या लागतील. या सर्वाचा विचार करून सर्वानुमते मेळावा शुल्क रु.1000/- (एक हजार रुपये) फक्त प्रति व्यक्ती ठरविण्यात आलेय. (प्रवासाची व निवासाची व्यवस्था प्रत्येकाला व्यक्तीगत स्थरावर करावी लागेल, अथवा आपल्या वर्षाच्या ग्रूप ॲडमीनशी संपर्क करुन त्याची व्यवस्था करावी).
प्रवेश शुल्क भरुन मेळाव्यासाठी नोंदणी ची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2025 ही ठरवण्यात आली आहे. नियोजनाचे दृष्टीने 29 नोव्हेंबर च्या आत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी अशी आग्रही विनंती आहे. या करिता खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपली नोंदणी करून शुल्क भरावे ही आग्रही विनंती.
कार्यक्रमाची रूपरेषा :
सकाळी 8 ते 10 नोंदणी व चहा- नाश्ता
10 वाजता शाळेची घंटा वाजेल आणि प्रार्थना व राष्ट्र गीत होईल
दुपारी 1 वाजेपर्यंत उद्घाटन सत्र व मेळावा.
दुपारी 1 ते 2 भोजन
दुपारी 2 ते 4 - Formation of Alumni Club
एकमेका साह्य करु, अवघे बनूया समृद्ध या उद्देशार्थ आलेल्या विद्यार्थांचे Networking (परिचय)
या सत्रात उच्च पदस्थ, व्यवसायिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यरत विद्यार्थी/विद्यार्थीनी (सर्व बॅच चे) यांच्याशी संवाद.
उपलब्ध data आपणांस pdf द्वारा देण्याच्या प्रयत्न राहिल.
दुपारी 4 वा. चहापान
शेवटी प्रार्थना झाल्यावर शाळेची घंटा वाजेल व मेळाव्याची सांगता होईल.
आपले सहकार्य सक्रीय उपस्थिती देऊन अपेक्षित आहे, नव्हे ते राहिलच असा विश्वास व खात्रीही आहेच, तरी लवकरात लवकर मेळावा शुल्क भरून आपण आपले रजिस्ट्रेशन करावे ही विनंती.
कार्यकारी समिती
माजी विद्यार्थी मेळावा
न्यू ईरा हायस्कूल,अकोला
1 photo

Saturday, December 27, 2025 at 08:00
New Era High School, Damle Chowk, Ramdaspeth, Akola, Maharashtra, India
Akola, Maharashtra
Entertainment

Event Organizer
Copy link to share
Share with your circle
Experience the event together and make it memorable.
Reach millions of event enthusiasts and grow your audience effortlessly with our trusted platform.
Trusted by thousands of organizers worldwide
Enter your code below to unlock special discounts
Promo codes are applied instantly at checkout
Codes are case-insensitive • Alphanumeric only